गावदेवी मुक्तादेवीच्या कुशीत वसलेली माझी शाळा सर्वच प्रकार आदर्श आहे. मुंबई सारख्या गोंगाटमय मायानगरीत शांत, निसर्गरम्य अशा मुक्तादेवीच्या डोंगरावर आमची शाळा असल्याने प्रसन्न व अध्ययनपूरक वातावरण येथे आहे.संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय मा श्री जितेंद्र गोस्वामीसाहेब व संचालिका मा श्रीमती प्रमिला गोस्वामीमॅडम यांनी उभारलेला हा ज्ञानवृक्ष आज हजारो श्रमिक व कष्टकऱ्यांच्या मुलांना आपल्या कृपाछत्रात सामावून आहे.
आमच्या प्राथमिक विभागाला बृहन्मुंबई मनपा शिक्षण अधिकारी मा श्री महेश पालकरसाहेब यांच्या हस्ते 'सर्वोत्कृष्ट शाळेच्या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. विविध स्पर्धा, उपक्रम, कार्यक्रम, सामाजिक कार्य ,शैक्षणिक गुणवत्ता याचबरोबर आपल्या संस्कृतीचे जतन व संवर्धन करणे आम्ही आमचे परम कर्तव्य समजतो.
शाळेत पूर्वप्राथमिक, प्राथमिक व माध्यमिक विभाग आहेत.शिष्यवृत्ती, टिळक विद्यापीठ, महाराष्ट्र प्रज्ञाशोध परीक्षा यांसह इ 10 वी चा निकाल 100 % असतो.आमच्या मुख्याध्यापिका श्रीमती संगीता सरमळकर मॅडम,यांच्या मार्गदर्शनाखाली आमचा शिक्षक वृंद प्रामाणिकपणे आपले कार्य करत आहेत. आपली प्राचीन मूल्य व आधुनिक तंत्रज्ञान यांचा उत्तम मेळ म्हणजे आमची शाळा.या शाळेचा एक घटक म्हणवून घेतांना मला सार्थ अभिमान वाटतो.

Swara Bhanudas Chaudhari
ReplyDeleteBhanudas Chaudhari
ReplyDelete